‘निपाह’ विषाणूची पुन्हा केरळात दहशत

0
38

कोरोनापेक्षाही भयंकर आणि जीवघेण्या निपाह विषाणूचा पुन्हा एकदा केरळमध्ये शिरकाव झाला आहे. याआधी तीन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये निपाह विषाणूने केरळच्या कोझीकोडमध्ये थैमान घातले होते. आता पुन्हा एकदा या विषाणूने डोके वर काढले आहे. ३ सप्टेंबर रोजी कोझिकोडमध्ये एका १२ वर्षांच्या मुलाचा निपाह विषाणूची लागण होऊन मृत्यू झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. निपाह विषाणू संक्रमित मृताच्या संपर्कात आलेल्या १८८ नागरिकांची कॉन्टक्ट ट्रेसिंगद्वारे ओळख पटवण्यात असून, तब्बल १६८ जणांना आपापल्या घरातच विलगीकृत केले आहे. त्यातील २० जणांना अति धोक्याच्या शक्यतेमुळे रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापैकी दोन रुग्णांत निपाहची लक्षणे आढळून आली आहेत.