नितीन गडकरी उद्या गोव्यात

0
85

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक रस्ते व महामार्ग, नौकानयन मंत्री नितीन गडकरी रविवारी दि. २ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय गोवा दौर्‍यावर येत आहेत. मुरगांव पोर्ट ट्रस्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी सहभागी होणार आहेत. सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे. दरम्यान, त्यांच्या उपस्थितीत वर्णापूरी ते मुरगांव बंदर दरम्यानच्या चौपदरी मार्गासंबंधीचा गोवा सरकार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात करार होईल.