एनपीटी मसुद्याविरुद्ध भारताचे मतदान

0
81

संयुक्त राष्ट्रसंघाच्या एनपीटी अर्थात अणू प्रसारबंदी करार मसुद्याविरुद्ध भारताने मतदान केले. अण्वस्त्रहीन राष्ट्र बनून या करारात सामील होण्याचा भारताचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निशस्त्रीकरणसंबंधी समितीने या करारात सामील न झालेल्या राष्ट्रांना करारावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली होती. कोरीया व इस्त्रायल, रशिया, यू.के., अमेरिकेनेही करारास विरोध केला. १६६ देशांनी त्याला पाठिंबा व्यक्त केला. निशस्त्रीकरणासंबंधीची मानसिकता विषम असल्याने भारत करारावर स्वाक्षरी करू इच्छित नाही, अण्वस्त्रे देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची आहेत, असे भारताने म्हटले.