नावेली पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसची कुतिन्होंना उमेदवारी

0
188

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांना काल जाहीर करण्यात आली.
गोवा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नावेली मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी प्रतिमा कुतिन्हो यांच्या नावाची घोषणा केली. कुतिन्हो यांनी जिल्हा पंचायत निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले होते. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीवरून त्यांनी निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगून ही पोटनिवडणूक एक आव्हान म्हणून स्वीकारत आहे, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.