Home बातम्या ‘नाटो’चा भारत, चीन, ब्राझीलला कडक इशारा

‘नाटो’चा भारत, चीन, ब्राझीलला कडक इशारा

0

युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या काही वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘नाटो’ने कठोर भूमिका घेतली असून, रशियाबरोबर व्यापारी संबंध ठेवणाऱ्या देशांना इशारा देण्यात आला आहे. रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या ब्राझील, चीन आणि भारत यासारख्या देशांवर 100 टक्के सेकंडरी टॅरिफ लादण्याचा इशारा नाटोचे सेक्रेटरी जनरल मार्क रुट्टे यांनी बुधवारी दिला.

अमेरिकन सिनेटरना भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मार्क रुटे म्हणाले की, जर तुम्ही चीनचे अध्यक्ष असाल, भारताचे पंतप्रधान असाल किंवा ब्राझीलचे अध्यक्ष असाल, तर तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की रशियासोबत व्यापार सुरू ठेवल्याने मोठे नुकसान होऊ शकते. या तीन देशांनी रशियाच्या अध्यक्षांवर दबाव आणावा जेणेकरून ते शांतता चर्चा गांभीर्याने घेतील. जर हे देश रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करत राहिले तर या देशांवर 100 टक्के सेकंडरी टॅरिफ लादले जाईल.