मध्य पूर्वेमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असून, स्वेदा येथे झालेल्या संघर्षात ड्रुझ अल्पसंख्याकांच्या संरक्षणाचा हवाला देत इस्रायलने बुधवारी दमास्कसमधील सीरियाच्या लष्करी मुख्यालयावर हवाई हल्ला केला. सोशल मीडियावर या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, किमान 18 जण जखमी झाले आहेत, असे सीरियन आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.सरकारच्या निर्देशांनुसार कारवाया सुरू राहतील आणि पुढील घटनांसाठी सैन्य सतर्क आहे, असेही इस्रायली संरक्षण दलांनी म्हटले आहे