नव्या मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आज निर्णय

0
109

>> वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांची माहिती

नव्या मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीसाठीची फाईल आज होणार्‍या राज्य मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी मंगळवारी दिली.

नव्या मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीसाठीची फाईल आपण हातावेगळी केली असून, ती आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे. सरकारने वाहतूक नियमभंगांसाठीचे दंड कमीत कमी ठेवले आहेत. सरकारने जर नव्या मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी केली नाही, तर केंद्र सरकारकडून होणार्‍या कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही गुदिन्हो म्हणाले.

रस्ता अपघातात मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई
रस्ता अपघातात ठार झालेल्या ५९ जणांच्या कुटुंबीयांना गोवा राज्य अंतरिम भरपाई योजनेखाली प्रत्येकी २ लाख रुपयांची भरपाई खात्याने दिली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एक वर्षासाठी वाढवल्याचेही गुदिन्हो यांनी सांगितले.

टॅक्सी मीटरसाठी अत्यल्प प्रतिसाद
पर्यटक टॅक्सींमध्ये मीटर बसवण्यास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे काम येत्या ६ महिन्यांत पूर्ण व्हायला हवे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

वाहतूक खात्याकडून १६ नव्या ई-सेवांचा शुभारंभ
वाहतूक खात्याने काल राष्ट्रीय परवाना, मालवाहतूक परवाना, अखिल भारतीय परवान्यांचे नूतनीकरण, मालवाहतुकीसाठीचा डुप्लिकेट परवाना आदींसह एकूण १६ नव्या ई-सेवांचा शुभारंभ केला. त्यामुळे आता लोकांना वाहतूक खात्याच्या सेवांसाठी कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही.