डिचोलीतील अपघातात ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

0
52

म्हावळींगे-डिचोली येथे सरकारी प्राथमिक शाळेजवळील रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दिलीप हरिश्चंद्र गावकर (रा. घाडीवाडा-म्हावळींगे) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात सोमवारी रात्री उशिरा घडला. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा नोंदविला आहे.

घाडीवाडा-म्हावळींगे येथील आपल्या घरी येत असताना सरकारी प्राथमिक शाळेजवळ बोरीचे मरड या ठिकाणी रस्त्यावर दिलीप गावकरला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्याच्या डोक्याला जबर मार बसला. ही घटना सोमवारी रात्री १०.१५ च्या सुमारास घडली. अपघातापूर्वी त्याला रस्त्यातून येत असताना गावातील दोघा-तिघांनी पाहिले होते. त्यानंतर १०.३० च्या दरम्यान तो रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसून आला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.