येथील नवीन मांडवी दि. 14 मे रोजी आणि जुना मांडवी पूल दि. 15 मे रोजी रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यासंबंधीची सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने काल जारी केली. नवीन मांडवी पूल 14 मे रोजी रात्री 10 ते सकाळी 6 आणि जुना मांडवी पूल 15 मे रोजी रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवला जाणार आहे. नवीन मांडवी पूल बंदच्या काळात अवजड वाहनांची वाहतूक अटल सेतू या पुलावरून केली जाणार आहे. जुना मांडवी पूल बंदच्या काळात वाहनांची वाहतूक नवीन मांडवी पुलावरून वळविली जाणार आहे.