Home बातम्या धेंपो स्पोर्ट्‌स क्लब अजिंक्यपदासमीप

धेंपो स्पोर्ट्‌स क्लब अजिंक्यपदासमीप

0

२४ सामन्यातील ५३ गुणासह आघाडीवर असलेल्या स्थानिक धेंपो स्पोटर्ं्‌स क्लबला जेतेपदासाठी शेवटच्या दोन सामन्यातून केवळ एक गुण पुरेसा आहे तर २३ सामन्यातून ४४ गुण मिळविलेल्या पाहुण्या इर्ंस्ट बंगालला जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान जिवंत राखण्यासाठी ही लढत जिंकणे अनिवार्य आहे.

शेवटच्या सामन्यापर्यंत प्रतिक्षा करण्याची धेंपोचे प्रशिक्षक आर्मांद कुलासो तयारी नसून स्वशौकिनांच्या साक्षीत आपले खेळाडू जेतेपदावर मोहोर लगावतील असा आत्मविश्‍वास ते बाळगून आहेत.

शेवटच्या सामन्यावर अवलंबून रहाणे धोकादायक ठरू शकते. खेळाडूंना या सामन्याचे महत्व ज्ञात आहे आणि मला खात्री आहे आज ईस्ट बंगालविरुध्दच सकारात्मक निर्णयासह, स्वशौकिनांच्या साक्षीत आय् लीग जेतेपदावर मोहोर लागेल, अशी अपेक्षा कुलासो यांनी प्रगटविली.

फातोर्डा मैदानावरील गेल्या दोन सामन्यात धेंपोने चमकदार खेळीत चर्चिल ब्रदर्स () आणि स्पोर्टिंग क्लब दी गोवा () यांच्याविरुध्द देखणे विजय मिळविले असून या महत्त्वपूर्ण लढतीतही अशाच शानदार कामगिरीची अपेक्षा असेल.

आमचे खेळाडू अनुभवी आहेत आणि अशाच महत्वाच्या सामन्यात काय करायचे ते मी सांगायची गरज नाही, असे प्रतिपादनही कुलासो यानी केले.

गेल्या सामन्यात स्पोर्टिंग क्लबविरुध्द खेळलेला संघच धेंपोचे प्रशिक्षक उतरविण्याची अपेक्षा आहे. कर्णधार तथा अनुभवी बचावपटू महेश गवळी दुखापतीतून सावरण्याची अपेक्षा आहे.

स्वमैदान आणि स्वशौकिनांचा पाठिंबा अशा अनुकूलतेमुळे मला कोणत्याही प्रकारचे दडपण वाटत नाही, असे सांगून दडपण असेलच तर ते ईस्ट बंगालवर असेल कारण ते परराज्यात खेळत आहे, अशी पुश्तीही कुलासो यानी जोडली.

या महत्वपूर्ण लढतीसाठी दाखल झालेल्या ईस्ट बंगालने आपले डावपेच गुप्त राखण्यासाठी केपे स्टेडियमवर सराव केला. जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान जिवंत राखण्यासाठी ईस्ट बंगालला हा सामने जिंकणे आवश्यक आहे, आणि आपला संघ प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सकारात्मक निकाल लावील असा आशावाद ईस्ट बंगालचे प्रशिक्षक ट्रेव्हर मॉर्गन यानी प्रगटविला. फातोर्डा मैदानावरील धेंपोविरुध्दच्या आजवरच्या ११ आय् लीग सामन्यात ईस्ट बंगालला केवळ एकमेव विजय मिळालेला आहे.

धेंपो स्पोर्टस क्लब आय् लीग जेतेपदाच्या उंबरठ्यावर असल्याने या सामन्यात खरे दडपण त्यांच्यावर असेल, असे सांगून ते पुढे म्हणाले, आम्ही विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहोत पण यश मिळाले तरी या एका विजयाने आम्ही चँपियन बनणार नाही याची जाण आम्हाला आहे पण हा अखेरचा आणि महत्वपूर्ण टप्पा आहे आणि अशा मोक्याच्या क्षणी काहीही घडू शकते, अशी पुस्तीही त्यानी जोडली. ईस्ट बंगालचा नायजेरियन बचावपटू उग्बा ओपकारा आज खेळणार नाही त्याची जागा भारताचा अंडर२३ कर्णधार राजू गायकवाड घेईल. धेंपो स्पोर्ट्‌स क्लबला आय् लीग जेतेपदासाठी शेवटच्या दोन सामन्यात केवळ एक ड्रॉपुरेसा आहे. तथापि, प्रयाग युनायटेडविरुध्दच्या दि. ५ मे रोजीच्या अखेरच्या सामन्यापर्यंत निर्णायकता लांबल्यास खरोखरच दडपण येईल आणि त्यामुळे आजच जेतेपदावर मोहोर उठविण्याची शिकस्त करावी लागेल. तर ईस्ट बंगालला शेष तिन्ही सामने जिंकावे लागतील आणि त्याचबरोबर धेंपोने शेष दोन्ही सामने गमवावे लागतील.

धेंपोचा हा लीगमधील २८३वा सामना असून त्यानी आय लीग आणि एनएफएलमध्ये ४५३ गोल नोंदले आहेत. ईस्ट बंगालचा हा ३३६ वा लीग सामना असून त्यानी आय लीग आणि एनएफएलमध्ये ४८६ गोल नोंदले आहेत.

आय लीगच्या फस्टर्ं लेगमध्ये धेंपोला ईस्ट बंगालकडून १२ अशी हार पत्करावी लागली होती. फेडरेशन कपमध्ये ईस्ट बंगालने धेंपोवर १० असा विजय मिळविला होता.

थेट प्रक्षेपण

टेन ऍक्शन+ आणि एनटीबी वाहिनीवर,

सायंकाळी ६ वा,