धर्मांतर मुद्यावरून संसदेत खडाजंगी

0
79

खासदार पप्पू यादव यांचे गैरवर्तन
धर्मांतराच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात निवेदन सादर करावे अशी मागणी विरोधकांनी कालही लावून धरल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार पप्पू यादव यांनी लोकसभा उपसभापती एम. थंबीदुरई यांच्या दिशेने वृत्तपत्र फाडून भिरकावल्याची घटना घडली. उपसभापतींनी चांगलेच खडसावल्यानंतर अखेर पप्पू यादव यांना माङ्गी मागून हे प्रकरण मिटविले.
धर्मांतराच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात निवेदन सादर करावे, ही विरोधकांची मागणी कालही कायम होती. खासदार पप्पू यादव यांनीही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी जोरदार मागणी करत वृत्तपत्र ङ्गाडून उपसभापतींच्या दिशेने भिरकावले. त्यांचे हे गैरवर्तन पाहून उपसभापती श्री. थंबीदुरई नाराज झाले. वृत्तपत्र ङ्गाडून सभापतींच्या खूर्चीच्या दिशेने भिरकावून विरोध दर्शविणे गैर असल्याचे सांगून उपसभापतींनी त्यांना चांगलेच खडसावले. ही घटना घडल्यानंतर प्रचंड गदारोळात सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
गेल्या आठवड्यापासून विश्व हिंदू परिषदेच्या वादग्रस्त ‘घर वापसी’ या कार्यक्रमावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत जोरदार गदारोळ सुरू असल्याने सभागृहाचे कामकाज ठप्प आहे. धर्मांतराविरोधात विरोधक एकत्र आले असून त्यांनी सत्ताधारी सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना खासदार पप्पू यादव यांनी लोकसभा उपाध्यक्षांच्या खुर्चीकडे फाडलेले वृत्तपत्र भिरकावल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.