देशभरात ७५ दिवसांनंतर सर्वांत कमी कोरोना रुग्ण

0
78

देशातील दररोज आढळणार्‍या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणार्‍याची संख्या वाढत आहे. पण मृत्यूंची संख्या कमी होताना दिसत नाही. गेल्या चोवीस तासांत भारतात कोरोनाचे ६०,४७१ नवीन रुग्ण आढळले आहेत. ही ७५ दिवसांनंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तर २,७२६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १,१७,५२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात २,९५,७०,८८१ कोरोनाबाधितसापडले असून त्यातील ३,७७,०३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २,८२,८०,४७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशात आता ९,१३,३७८ रुग्णांवर उपचार सुरू असून भारतात सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६४ टक्के आहे. गेल्या २४ तासांत तामिळनाडूत १२,७७२, रुग्ण आढळले. त्याखालोखाल महाराष्ट्रात ८,१२९, केरळमध्ये ७,७१९, कर्नाटकमध्ये ६,८३५ आणि आंध्र प्रदेशमध्ये ४५४९ रुग्ण आढळले आहेत.