देशभरात चोवीस तासांत एक हजारांहून अधिक मृत्यू

0
155

पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची तीव्रता प्रचंड असून दररोज नवनवे उच्चांक नोंदवले जात आहेत. देशात बुधवारी आतापर्यंतची विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. तर गेल्या २४ तासांत देशात १ हजारपेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे. देशात कोरोना संकट दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे.फेब्रुवारीपर्यंत देशात दिवसाला १० ते १३ हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. फेब्रुवारीपासून हे चित्र बदललं असून, अवघ्या दोन महिन्यातच पहिल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्येचा विक्रम मोडीत निघाला आहे. विशेष म्हणजे आता दररोज विक्रमी रुग्णवाढ नोंदवली जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकेडवारी जाहीर केली आहे. केंद्राने जाहीर केलेली ही आकडेवारी भयावह आहे. देशात २४ तासांत १ लाख ८४ हजार ३७२ बाधित आढळून आले तर १ हजार २७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ८२ हजार ३३९ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत १ लाख ७२ हजार ८५ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या १३ लाख ६५ हजार ७०४ रुग्ण उपचार घेत आहेत.