देशात मागील २४ तासांत २.५७ लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मागील २० दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ८७.७६ टक्के झाले आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ३० लाखांहून अधिक जण बरे झाले आहेत. तर मागच्या २४ तासांत ४ हजार १९४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्लीत सर्वाधिक कोरोना मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. सध्या ८ राज्यांत १ लाखाहून अधिक, ८ राज्यांमध्ये ५० हजार ते १ लाखादरम्यान तर २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत ५० हजारांहून कमी रुग्ण असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. देशात आतापर्यंत ४५ वर्षांवरील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचार्यांना १८.४१ कोटी लशींचे डोस देण्यात आले तर १८ ते ४४ वयोगटातील ९२ लाख डोस देण्यात आले आहेत.