ओकांब- धारबांदोडा येथे शनिवारी दूधसागर नदीत बुडलेल्या प्रथम सुरज सावंत (21, माशे- काणकोण) याचा मृतदेह रविवारी सकाळी दुपारी शोधकार्य सुरू असताना आढळून आला. रविवारी सकाळपासूनम अग्निशामक दल व फोंडा पोलीस यांच्याकडून शोधकार्य सुरू करण्यात आले होते. यावेळी मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्याचे दिसून आल्यावर कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला.
शनिवारी दुपारी वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या प्रथम सावंत हा युवक दूधसागर नदीतून बेपत्ता झाला होता. कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगांव येथील इस्पितळात नेण्यात आला.