Home Featured प्रियोळात वाहनाची धडक, ‘ब्लॅक पँथर’चा मृत्यू

प्रियोळात वाहनाची धडक, ‘ब्लॅक पँथर’चा मृत्यू

0

कोने-प्रियोळ येथील राष्ट्रीय महामार्गवर मध्यरात्री 12. 45 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत ब्लॅक पँथरचा मृत्यू झाला. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी व फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत ब्लॅक पँथरला ताब्यात घेतले. ब्लॅक पँथरच्या मृत्यूची गंभीर दखल घेऊन वनमंत्री विश्वजीत राणे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

कोने-प्रियोळ येथे मध्यरात्री रस्ता ओलांडताना ब्लॅक पँथर अज्ञात वाहनाला धडकला. रात्रीच्यावेळी मार्गावरुन जाणाऱ्या एका नागरिकाला ब्लॅक पँथर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्याने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी व फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या ब्लॅक पँथरला ताब्यात घेतले. मात्र उपचार करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.