दिल्लीत पाचव्यांदा लॉकडाऊनमध्ये वाढ

0
122

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा आठवड्याची वाढ केली आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत १६०० रुग्णांची नोंद झाली आहे. तरीही दिल्लीत सलग पाचव्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने अवधी वाढवला आहे. असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीत लॉकडाऊनचा अवधी आता ३१ मे रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. यावेळेसही दिल्लीत मेट्रोवरील निर्बंध कायम असतील.