Home बातम्या आसाममधील चकमकीत ७ अतिरेक्यांचा खात्मा

आसाममधील चकमकीत ७ अतिरेक्यांचा खात्मा

0

भारतीय लष्कराच्या आसाम रायफल्स आणि आसाम पोलिसांनी रविवारी संयुक्त मोहीम राबत दिमासा नॅशनल लिबरेेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या ७ अतिरेक्यांना चकमकीत ठार केले. नागालँडच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम कर्बियांगलॉंग जिल्ह्यात ही चकमक झाली. या ठिकाणी अतिरेकी लपून असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सुरक्षा दलांनी घेरताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. यावेळी सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ७ अतिरेकी ठार झाले. तर २ गंभीर जखमी झाले. ठार झालेल्या अतिरेक्यांकडून मोठा प्रमाणात दारूगोळा आणि ४ एके-४७ रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.