दाबोळी विमानतळावर ५४ लाखांचे सोने जप्त

0
53

दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईत काल २ किलो वजनाच्या सोन्याच्या बिस्किटा जप्त केल्या. त्यांची किंमत ५४ लाख रुपये आहे. अन्य एका कारवाईत चार लाख रुपयांच्या सिगरेट्‌स जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी दोघा केरळीयन प्रवाशांना दंडात्मक कारवाईनंतर सोडण्यात आले. काल पहाटे कस्टम अधिकार्‍यांना हवाई गुप्तहेर अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुबईहून पहाटे ४.३० वा. आलेल्या एअर इंडिया (एआय ९९४) या विमानातील प्रवाशाकडे २ किलो सोन्याची बिस्किटा सापडल्या. आपल्या हातातील बॅगेच्या पुढील कप्प्यात त्याने त्या लपवून ठेवल्या होत्या.

४ लाखांच्या सिगारेट्‌स जप्त
दरम्यान, दुसर्‍या एका कारवाईत शारजाहून पहाटे ५ वा. आलेल्या एअर अरेबिया (जी ९- ४९२) या विमानातून आलेल्या प्रवाशाकडून ४ लाख रुपयांच्या सिगरेट्‌स जप्त करण्यात आल्या. सदर सिगरेट्‌स त्याच्या बॅगेत सापडल्या. वरील दोन्ही कारवाईतील प्रवासी केरळ येथील असून त्यांची नावे मात्र गुप्त ठेवण्यात आली आहेत. पुढील तपास चालू असल्याचे जकात अधिकार्‍यांनी
सांगितले.