दक्षिण आफ्रिकेसमोर १८९ धावांचे लक्ष्य

0
88

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद १८८ धावा केल्या आहेत. मनीष पांडे व महेंद्रसिंग धोनी यांंनी पाचव्या गड्यासाठी केलेल्या ९८ धावांच्या अविभक्त भागीदारीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या रचणे शक्य झाले. रोहित शर्मा (०) व विराट कोहली (१) यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. टीम इंडियाने या सामन्यासाठी आजारी असलेल्या जसप्रीत बुमराह याला विश्रांती देऊन शार्दुल ठाकूर याला टी-२० पदार्पणाची संधी दिली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यातील संघात बदल केला नाही.

धावफलक
भारत ः शिखर धवन झे. बेहार्दिन गो. ड्युमिनी २४, रोहित शर्मा पायचीत गो. डाला ०, सुरेश रैना पायचीत गो. फेलुकवायो ३१, विराट कोहली झे. क्लासेन गो. डाला १, मनीष पांडे नाबाद ७९ (४८ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार), महेंद्रसिंग धोनी नाबाद ५२ (२८ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार), अवांतर १, एकूण २० षटकांत ४ बाद १८८
गोलंदाजी ः ख्रिस मॉरिस ४-१-४२-०, ज्युनियर डाला ४-१-२८-२, डॅन पॅटरसन ४-०-५१-०, जेपी ड्युमिनी २-०-१३-१, तबरेझ शम्सी २-०-२४-०, आंदिले फेलुकवायो २-०-१५-१, जॉन जॉन स्मट्‌स २-०-१५-०