‘त्या’ संबंधीचे प्रश्‍न पर्रीकरांनाच विचारा : पार्सेकर

0
76

संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर नजीकच्या काळात पुन्हा स्थानिक राजकारणात येणार आहेत की नाही हे आपणाला माहीत नाही. मात्र, ते येणार असतील तर आपण त्यांचे स्वागत करतो, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. पत्रकारांनी त्यांना काल त्याबाबत छेडले असता त्यानी वरील भाष्य केले. मनोहर पर्रीकर हे आपण गोव्यात परतणार असल्याचे सांगत आहेत असे पत्रकारांनी त्यांच्या नजरेस आणून दिले असता तसे असेल तर त्यासंबंधीचे सर्व प्रश्‍न तुम्ही त्यांनाच विचारायला हवेत, असेही पार्सेकर यावेळी म्हणाले.
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हे पुुन्हा स्थानिक राजकारणात प्रवेश करण्यास इच्छुक असून ते लवकरच पुन्हा गोव्यात येऊन मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेणार असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. साळ व पणजी येथील कार्यक्रमांदरम्यान पर्रीकर यांनी आपण गोव्याच्या राजकारणात पुन्हा येणार असल्याचे संकेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांवेळी दिले होते.