आमदार मोन्सेरात विरोधातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

0
86

पणजी पोलीस स्थानकावरील हल्ला व जाळपोळ प्रकरणातील संशयित आरोपी आमदार बाबुश मोन्सेरात, त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांच्याविरुध्द येथील सीबीआय न्यायालयात चालू असलेल्या खटल्याची सुनावणी काल पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता येत्या ३१ रोजी होणार आहे.मोन्सेरात पती-पत्नी विरोधातील आरोपपत्राच्या अनुषंगाने ही सुनावणी व्हावयाची होती. मात्र बाबुश मोन्सेरातसह अन्य संशयित उपस्थित न राहिल्याने ती पुढे ढकलण्यात आली.