तुर्की, सीरियातील भूकंपात आतापर्यंत 29 हजार मृत्यू

0
27

तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे दोन्ही देशांतील मृतांची संख्या वाढत असून आतापर्यंत 29 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींचा आकडा 78 हजारांहून अधिक झाला आहे. त्याचवेळी सीरियामध्ये वेळेवर मदत पोहोचत नसल्याचेही दिसून येत आहे. भूकंपानंतर रस्त्यांवर प्रेतांचा ढिग साचला आहे हे त्याचे कारण आहे.

भारताची मदत

ऑपरेशन दोस्त अंतर्गत भारताने तुर्कीला औषधांचे 841 खोके पाठवले आहेत. यासोबतच संरक्षण सुरक्षा साधनेही पाठवण्यात आली आहेत.
आर्मेनिया-तुर्कीये सीमा जवळपास 30 वर्षांनंतर मदत सामग्री पोहोचवण्यासाठी खुली करण्यात आली आहे. ही सीमा 1993 मध्ये बंद करण्यात आली होती. तुर्कीमध्येच 21,848 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सीरियामध्ये 3,553 लोकांचा मृत्यू झाला आहे.
तुर्कस्तानमध्ये ढिगाऱ्यातून एका भारतीयाचा मृतदेह सापडला आहे. विजय कुमार असे या व्यक्तीचे नाव असून वय 35 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. तो उत्तराखंडचा रहिवासी असून 23 जानेवारी रोजी तुर्कीला गेला होता.