मत्स्य महोत्सवाची कांपाल येथे सांगता

0
10

राज्य सरकारच्या मच्छीमारी खात्याने कांपाल पणजी येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय मत्स्य महोत्सवाची काल थाटात सांगता करण्यात आली आहे.
या मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन गेल्या 10 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते, मच्छीमारमंत्री नीळकंठ हर्ळणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या मत्स्य महोत्सवानिमित्त राज्यातील विद्यार्थी, नागरिकांना विविध प्रकारचे मासे पाहण्याची संधी प्राप्त झाली. या महोत्सवानिमित्त मच्छीमारी साहित्याचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. खवय्यांसाठी विविध प्रकारचे स्टॉल्स उपलब्ध होते.

समुद्र, मच्छीमारीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मुलांसाठी चित्रकला, वेषभूषा, टाकाऊपासून टिकाऊ आदी स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांना विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद लाभला. या स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या मत्स्य महोसत्वानिमित्त संगीत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.