Home बातम्या तुये इस्पितळाचेसोमवारी उद्घाटन

तुये इस्पितळाचेसोमवारी उद्घाटन

0

गोवा सरकारने तुये येथील इस्पितळाचे ‘सरकारी इस्पितळ व संशोधन केंद्र, तुये’ असे नामकरण करून या इस्पितळाचे सोमवार दि. 2 फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्याचे ठरवले आहे. या इस्पितळात एकूण 13 बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार असून, त्यात मेडिसीन विभाग, शस्त्रक्रिया विभाग, अस्थिरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, दंतचिकित्सा विभाग, नेत्ररोग विभाग, बालरोग विभाग, आयुष विभाग, मनोरुग्ण विभाग, फिजियोथेरपी विभाग, ईएनटी विभाग, रेडिओलॉजी विभाग, त्वचारोग विभाग या विभागांचा समावेश असेल. बाह्यरुग्ण विभागात गोवा वैद्यकीय महाविद्यालय तसेच आरोग्य सेवा संचालनालयातील तज्ज्ञ डॉक्टर सेवा देतील. ऑपरेशन थिएटर सर्व सुविधांनी सुसज्ज बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, चार महिन्यांत ही ऑपरेशन थिएटर्स सुरू होतील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल इस्पितळाचा फेरआढावा घेतल्यानंतर तुये इस्पितळाचे वरील नामकरण करून त्याचे 2 फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे इस्पितळ सुरू करण्याच्यात विलंब केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करून ते लवकर सुरू केले जावे अशी मागणी होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.