Home बातम्या तीन घुसखोरांनाउरी येथे अटक

तीन घुसखोरांनाउरी येथे अटक

0

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी उधळून लावला आहे. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्य तीन जणांना भारतीय लष्कराच्या जवानांनी अटक करत मोठी कारवाई केली. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी ही कारवाई केली. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने काल ‘एक्स’वर (ट्विटर) दिलेल्या माहितीनुसार, एका विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे उरी परिसरात ही कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईचा भाग म्हणून शोध मोहीम सुरू असतानाच सतर्क जवानांनी तीन जणांना ताब्यात घेतले. ते कथितरित्या या भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. या कारवाईच्या दरम्यान त्यांच्या स्थानिक एका मार्गदर्शकालाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.