तालिबानकडून सरकार स्थापनेसाठी हालचाली

0
45

अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग आला असून १६ ऑगस्ट रोजी देशावर ताबा मिळवल्यानंतर अमेरिकन सैन्य माघारी गेल्यावर आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापन करण्यासाठी आणि नवीन मंत्रीमंडळ बनवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. तीन दिवसांनंतर तालिबानकडून सत्ता स्थापनेसंदर्भात घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व सहकारी गटांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी तालिबानला किमान तीन दिवसांचा अवधी लागणार आहे. तालिबानचे सांस्कृतिक आयोगाचे सदस्य बिलाल करीमीने संघटनेचा प्रमुख नेता हिबतुल्लाह अखुंदजादाच्या नेतृत्वाखाली यासंदर्भातील चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर सरकारच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरदारवर सोपवण्यात येणार आहे.

नवीन सरकारमध्ये पवित्र आणि सुशिक्षित लोकांचा समावेश असेल तसेच महिलांनाही स्थान देण्यात येणार असल्याचे कतारमध्ये तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे उपप्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजईने दिली आहे.

सत्तेची हाव तालिबानमधील अंतर्गत संघर्षाला पुन्हा खतपाणी घालू शकते. त्यामुळे मागील अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेली सत्ता टिकवणे, अफगाणिस्तानमधील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे अशी आव्हाने तालिबानसमोर आहेत.