… तर काळ्या पैशाच्या तपासकामात बाधा : जेटली

0
107

विदेशी बँकांमध्ये काळा पैसा दडविलेल्यांची नावे जाहीर करण्याची मागणी करणार्‍या कॉंग्रेस पक्षासह सर्वांवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल जोरदार टीका केली. अशा लोकांची नावे अनधिकृतपणे जाहीर केल्यास याप्रकरणाच्या तपासकामात त्यामुळे बाधा येणार असून अपराध्यांना त्याचा लाभही होणार असल्याचा त्यांनी दावा केला.काळा पैसेवाल्यांच्या नावांची यादी जाहीर केल्यास करविषयक कराराचा भंग होत असल्याचा दावाही जेटली यांनी केला. कॉंग्रेस पक्षाची या संदर्भातील भूमिका समजण्यासारखी आहे. कारण एसआयटीकडे असलेल्या काळा पैसेवाल्यांविरुध्दचे पुरावे उघड झालेले कॉंग्रेला नको असल्याचे मत त्यांनी मांडले.
सर्वोच्च न्यायालयाने जे काम एसआयटीकडे सोपविले आहे. त्यात ही संस्था पूर्ण यशस्वी होऊन सत्य उघड होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या कामी एनडीए सरकार एसआयटीला पूर्ण सहकार्य करील असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र नावे जाहीर करण्याच्या अनुषंगाने बोलायचे झाल्यास ही यादी अनधिकृतपणे जाहीर करायची की ते काम करारानुसार करायचे असे पर्याय सरकारसमोर असल्याचे ते म्हणाले.