डोंगरी वॉर्डला अजिंक्यपद

0
104

डोंगरी वॉर्डने अंतिम सामन्यात कुरिलो-बेबेपेडा संघाचा टायब्रेकवर ४-३ अशा गोलफरकाने पराभव करीत माजोर्डा पॅरिश यूथने माजोर्डा-उतोर्डा-कालाता ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आयोजित आंतर वॉर्ड फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद प्राप्त केले.
उतोर्डा येथील सागच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात पूर्ण वेळेत दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत राहिले होते. त्यामुळे रेफ्रीने निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब केला. त्यात डोंगरी वॉर्डने ४-३ अशी बाजी मारत रु. १०,००० व चषक पटकाविला. तर उपविजेत्या कुरिलो-बेबेपेड्डा संघाला रु. ७,०००चे बक्षीस प्राप्त झाले.
उत्कृष्ट मध्यपटू – स्टीव्ह फर्नांडिस, उत्कृष्ट स्ट्रायकर – म्युटन फर्नांडिस, उत्कृष्ट गोलरक्षक – पृटो फर्नांडिस, उत्कृष्ट बचावपटू – वेलिंटन डिकॉस्ता, सर्वाधिक गोल – रेमेडिअस बार्रेटो यांची वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीसाठी निवड झाली.