पार्थ कामत, गिरिजा पेडणेकरला अजिंक्यपद

0
124

>> अंडर-९ खुली व मुलींची राज्य बुद्धिबळ स्पर्धा

पार्थ कामत आणि गिरिजा पेडणेकर यांनी फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे गोवा बुद्धिबळ संघटनेच्या अधिपत्याखाली आयोजित केलेल्या डिस्ट्रिक्ट ३१७बी लायन्स क्लब इंटरनॅशनल अखिल गोवा अंडर-९ खुल्या व मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत अनुक्रमे जेतेपदे पटकाविली.

मंगेशी येथील वागळे हायस्कूलच्या सभागृहात खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण १३६ मुलां-मुलींनी सहभाग घेतला होता. अथर्व नारायण आणि श्रीया पाटील यांना अनुक्रमे खुल्या व मुलींच्या गटात द्वितीय स्थान प्राप्त झाले.
अमानत अली, आरव कामत, सागर शेट्टी, आदित्य तारी, एड्रिक वाझ, राहुल सहकारी, स्कंधज कोठा व अथर्व सावळ यांना खुल्या गटात ३ ते १०वे स्थान प्राप्त झाले. तर वालांका फर्नांडिस, जेनिका सीक्वेरा, अस्मिता रे, सय्यद महदिया, साईजा देसाई, सय्यद मैजाह, रिविया रायकर व निधी शिरोडकर यांनी मुलींच्या विभागात ३ ते १०वे स्थान प्राप्त केले. इर्विन अल्बुकेर्क, रोहित भारद्वाज, पूर्वी नायक, सौमिली बिश्‍वास, पुष्टी भोसले व वेदान्त परब यांना उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त झाली.

बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गोव्हर्नर लायन साईश लवंदे यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर, फोंडा तालुका बुद्धिब संघटनेचे अध्यक्ष अमोघ नमशिकर, खजिनदार महेश खेडेकर, स्पर्धा संघटक सागर साकोर्डेकर व मुख्य लवाद अरविंद म्हामल यांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. सौ. प्रीती कामत यांनी सूत्रसंचालन तर अमोघ नमशिकर यांनी आभार व्यक्त केले.