डिचोलीत भाजपला ९, सावळना ३, शेट्येंना १ जागा

0
160

>> सहा महिला नगरसेवक; अपक्ष नीलेश टोपलंेंचे भाजपला समर्थन

डिचोली नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या एकूण १४ पैकी नऊ उमेदवार विजयी ठरले, तर माजी आमदार नरेश सावळ यांच्या ‘टुगेदर फॉर बिचोली’ गटाचे ३ व शेट्ये बंधूंच्या ‘डिचोली व्हीजन’चा एक अपक्ष विजयी झाला. अपक्ष उमेदवार निलेश टोपले यांनी भाजपला समर्थन दिले आहे.

डिचोली पालिकेच्या एकूण १४ जागांपैकी ६ जागांवर महिला नगरसेवक निवडून आल्या असून त्यातील दोन नगरसेविका या पेशाने वकील आहेत. पांडुरंग कोरगावकर (३१) हे नगरसेवक सर्वांत तरुण नगरसेवक आहेत.
जिल्हा पंचायत निवडणुकीत लाटंबारसेतून ३२०० मतांची आघाडी घेतलेल्या शेट्ये बंधूंनी पहिल्याच वेळी पालिका निवडणुकीत प्रवेश केला होता. त्यांचा एक उमेदवार निवडून आला.