ट्रक – कारच्या टक्करीत पर्वरीत कारचालक ठार

0
83

पर्वरी महामार्गावर काल मध्यरात्री ट्रक व कार यांची समोरासमोर टक्कर होऊ झालेल्या भीषण अपघातात कारचालक अजयकुमार सोकलानी (म्हापसा) जागीच ठार झाला. कारमध्ये बसलेला सहप्रवासी सावियो फर्नांडिस गंभीर जखमी झाला. निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे.

पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१० रोजी मध्यरात्री २.२५ वाजता पर्वरी महामार्गावरील ग्रीन हाउसजवळील बिग डॅडी शोरूमसमोर म्हापसा – पणजी वाहतूक करणारा एमएच ०४ – सीयू – ३१४१ क्रमांकाचा टाटा मालवाहू ट्रक आणि पणजीहून म्हापसा येथे जाणार्‍या जीए – ०३ – पी – ७१५० क्रमांकाच्या आय टेन कारची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात कारचालक अजयकुमार कारमध्ये चिरडून जागीच ठार झाला तर सहप्रवासी सावियो याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. ट्रकचालक पांडुरंग गोविंद साळुंखे याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हवालदार ज्ञानेश्‍वर मळीक यांनी पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.