झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?…

0
209

अशाप्रकारे या आदर्श पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस आरंभ करा. निद्रावस्थेत विषद्रव्ये निष्कासीत केल्यानंतर तुम्ही श्‍वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा साठवून घेण्यासाठी ताजेतवाने होऊन उठा. त्यानंतर तुम्ही मोठ्या आतड्यातील मैल बाहेर टाकून द्या. आणि त्यानंतर तुम्ही नवीन दिवसाच्या नव्या सुरुवातीला आवश्यक तो पोषणयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्या.

झोप (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का? असे ऐकीवात आहे की ‘‘लवकर निजे लवकर उठे तया आरोग्यसंपदा लाभे’’ हे किती खरे आहे? उशिरा झोपून उशिरा उठले तर नाही चालणार का? पाहूया… खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीक्‌टीक् करत असते. आणि ते अतिशय तंतोतंत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते. रात्री ११ ते पहाटे ३ या कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात रोखलेली असते. तुमचे यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. या महत्त्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची (डिटॉक्सिफिकेशन) महत्त्वाची प्रक्रिया होत असते. तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करून त्यांना बाहेर काढण्याचे अतिमहत्त्वाचे कार्य या रात्री ११ ते पहाटे ३ च्या वेळेत होत असते. तथापि जर तुम्ही या वेळेत झोपू शकला नाहीत तर तुमचे यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरीत्या करू शकणार नाही. जर तुम्ही रात्री ११ वा. झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पूर्ण चार तासांचा वेळ मिळतो. जर १२ वा. झोपलात तर ३ तास; जर १ वा. झोपलात तर २ तास आणि जर २ वाजता झोपलात तर फक्त १ तास तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ मिळेल. आणि जर… तुम्ही पहाटे ३ वाजता झोपलात तर..?? दुर्दैवाने तुमच्या शरीराकडे खरे तर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ नाही. जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर ही विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात कालानुक्रमे वाढत जातील. आणि तुम्हाला माहीत आहे.. पुढे काय होईल? काय होते जेव्हा तुम्ही उशिरा झोपता आणि उशिरा उठता? उशिरा झोपण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का? तुम्ही रात्रभर कितीही तास झोपला तरी सकाळी खूप थकल्यासारखे वाटले असेल! ‘‘उशिरा झोपून उशिरा उठणे’’ खरेतर तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्त्वाच्या क्रियांचे वेळापत्रकसुद्धा बिघडवता. पहाटे ३ ते ५ वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मध्ये केंद्रीत होते. या वेळेत तुम्ही काय करणे योग्य आहे? … खरेतर तुम्ही शारीरिक हालचाली आणि मोकळ्या हवेत श्‍वास घेऊन शरीरात ऊर्जा साठविण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. या सकाळच्या वेळेस हवा ही खूप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋणभाराच्या विद्युत कणांनी परिपूर्ण असते. सकाळच्या ५ ते ७ या वेळेत रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रीत होते. आता तुम्ही काय करायला हवे?… तुम्ही शौचकर्म उरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यांतून सर्व मैल किंवा मल बाहेर जाऊ द्या. ‘‘तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषक द्रव्ये शोषून घेण्यास मदत करा किंवा तयार करा. सकाळी ७ ते ९ या वेळेत रक्ताभासरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते. आता तुम्ही काय करायला हवे? … तुमचा नाश्ता उरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपूर्ण दिवसभरातील सर्वांत महत्त्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक की सर्व पोषणद्रव्ये यातून मिळतील, याची काळजी घ्या. परीपूर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागू शकते. तर.. असा आहे तुमचा दिवस उत्तम प्रकारे सुरू करण्याचा राजमार्ग… अशाप्रकारे या आदर्श पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस आरंभ करा. निद्रावस्थेत विषद्रव्ये निष्कासीत केल्यानंतर तुम्ही श्‍वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा साठवून घेण्यासाठी ताजेतवाने होऊन उठा. त्यानंतर तुम्ही मोठ्या आतड्यातील मैल बाहेर टाकून द्या. आणि त्यानंतर तुम्ही नवीन दिवसाच्या नव्या सुरुवातीला आवश्यक तो पोषणयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्या. यात काहीच आश्चर्य नाही की ग्रामीण भागातील किंवा शेतात राहणारे शेतकरी हे सुदृढ असतात. ते लवकर झोपून लवकर उठतात. ते त्यांचे शरीराचे नैसर्गिक जैवीक घड्याळ पाळतात. शहरात मात्र हे झोपेचे घड्याळ पाळणे खूप अवघड जाते. आपल्याकडे चांगला विद्युत प्रकाश, टीव्ही, मोबाइल गेम्स, व्हॉट्‌स ऍप, फेसबुक, इंटरनेटमध्ये व्यस्त असल्यामुळे आपण आपली अमूल्य अशी झोपेची वेळ पाळत नाही. आपले नैसर्गिक वेळापत्रक पाळताना ः- * एकदा मला माझ्या शरीरातील जेवीक घड्याळाची माहिती मिळाल्यानंतर मी ते पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. जर मी लवकर उठलो तर, जरी माझा दिवस नेहमीप्रमाणे कंम्युटरवर चालू झाला आणि मला घड्याळात ७ वाजलेले दिसले तर मला माहीत आहे की ही नाश्त्याची सर्वोत्तम वेळ आहे. तर मी माझा नाश्ता आहार शरीराद्वारे उत्तम प्रकारे शोषण करण्यासाठी ९ च्या वेळेआधी करण्याचा प्रयत्न करीन. जर तुम्हाला कुणी रात्रपाळीची नोकरी जरी देऊ केली तरी नोकरी नाकारण्याचा सल्ला देईन. दूरदृष्टीने विचार केला तर तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे आरोग्यविषयक तक्रारींवर खर्च करावे लागतील. याप्रकारे जास्तीत जास्त या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे दैनंदिन वेळापत्रक असे तयार करा. मला खात्री आहे तुम्ही संपूर्ण दिवस अधिक उत्साही आणि ताजेतवाने रहाल.