ज्येष्ठ समाज कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे निधन

0
47

सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणार्‍या कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ (७५) यांचे काल निधन झाले. सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते.

सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणत असत. सिंधुताई सपकाळ पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे शिक्षणही जेमतेम चौथीपर्यंत झाले होते. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली. सिंधुताई यांना तब्बल ७५० पेक्षा अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २०२१ सालचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. तसेच त्यांना पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार’ आणि महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.