ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गोवारीकर यांचे पुण्यात निधन

0
181

ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. वसंत गोवारीकर यांचे वयाच्या ८१व्या वर्षी येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. अवकाश संशोधन व हवामान शास्त्रात त्यांनी मौल्यवान योगदान दिले आहे.
पॉलिमर केमिस्ट्रीतील त्यांचे संशोधन जगभरात गाजले. डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबत भारतीय अवकाश तंत्रज्ञानाच्या प्रगतीतही त्यांचा वाटा होता. १९९१ ते ९३ दरम्यान त्यांनी पंतप्रधानांचे विशेष सल्लागार म्हणून जबाबदारी पार पाडली. १९९४-२००० या कालावधीत त्यांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.