वाडे-वास्कोत सुरक्षा दलाच्या जवानांच्या भांडणामुळे तणाव

0
69

वाडे वास्को येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानाने एका युवकाला मारहाण केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. मारहाण झालेल्या युवकाचे नाव सर्वेश गजानन अक्कासली (२३) तर मारहाण केलेल्या सुरक्षा जवानाचे नाव विरेंद्र यादव असे आहे. सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार सर्वेश अक्कासली (२३) हा वाडे येथे बजाज शोरुम जवळ पोचला असता त्याला फोन आला. फोन कॉल घेण्यासाठी तो मुख्य रस्त्यावरून बाजूला सिंगबाळ बिल्डिंग जवळ राहून फोन वर बोलत असताना याच बिल्डिंगमध्ये राहणार्‍या सीआयएसएफच्या उपनिरीक्षक विरेंद्र यादव याने तू इथे राहून फोन का करतोस असा सवाल करुन भांडणास सुरुवात केली व ठोसा मारला. भांडण चालू असताना विरेंद्र सिंह यांची पत्नी व त्यांच्याकडे आलेल्या सहाही जणांनी सर्वेशला रस्त्यावर आडवा घालून मारहाण केली. भांडण चालू असताना तिथे लोकांनी गर्दी केली तेव्हा यादवच्या पत्नीने गोमंतकीय जनतेबाबतीत अपशब्द उच्चारले असता लोक चवताळले व हे प्रकरण बरेच तणाव ग्रस्त झाले. शेवटी हे प्रकरण पोलिसात नेण्यात आले.