१५ रोजी पाटो पणजी येथे आपण पार्क करून ठेवलेल्या आपल्या स्कॉर्पियो जीपमधून (जीए-०७ सी ४२९५) आपले ६५ हजार रु. चोरट्यांनी लांबवल्याची तक्रार प्रवीण वसंत कुंकळकर (करंजाळे) यांनी पणजी पोलिसात नोंदवली आहे.
आपण एका छोट्या बॅगेत घालून हे पैसे गाडीत ठेवले होते. पैशांबरोबरच बॅगेतील डेबिट कार्ड व अन्य महत्त्वाची कागदपत्रे चोरीस गेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.