जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0
16

जम्मू- काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात एक तर कुलगाम जिल्ह्यात एक असे दोन दहशतवादी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. सुरक्षा दलाच्या जवानांना अनंतनागच्या सिरहामा भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागाला वेढा घालून तेथे शोधमोहीम सुरू केली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले. त्यात लष्कर-ए-तोयबाचा एक स्थानिक दहशतवादी ठार झाला. दरम्यान, दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील डी. एच. पुरा भागातील चाकी समद भागात सुरू असलेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार झाला.