जगातील पहिल्या वीजेवरील रस्त्याची स्वीडनमध्ये चाचणी

0
94

हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचा एक भाग म्हणून आता स्वीडनमध्ये जगातील पहिल्या वीजेवर चालणार्‍या रस्त्याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी मध्य स्वीडनमधील गॅवले शहरातील मार्गाची चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. सर्वसामान्य वाहतूक व्यवस्थेतच चालणार असलेले वीजेवरील ट्रक या मार्गावर धावतील. सीमेन्स कंपनीने विकसित केलेल्या तंत्रज्ञान आधारित ई १६ मोटरवेवर स्कॅनियातील हायब्रीड विद्युत ट्रक २ कि. मी. अंतर धावणार आहेत. हे ट्रक दोन्ही प्रकारच्या मार्गांवर धावू शकतील अशा प्रकारचे हे तंत्रज्ञान आहे.

स्कॅनिया ट्रक हे जैविक इंधनावरील असून ते युरो ६ प्रमाणित आहेत. स्कॅनिया ट्रकना वीजपुरवठा पँटोग्राफ पॉवर कलेक्टरमधून केला जातो जो डोक्यावरील (ओव्हरहेड) वीज तारांना जोडलेला असेल आणि रस्त्याच्या उजवीकडील लेनच्या दिशेने या तारा असतील. वरील वीज तारांशी वाहन चालू असताना सुरळीतपणे जोडले जाणे किंवा वेगळे होणे याबाबत या ट्रकांची क्षमता आहे. वीजेवरील मार्गाच्या लेनबाहेर ट्रक गेला तर पँटोग्राफ वेगळा होता आणि नंतर ट्रक कम्बशन इंजिनवर किंवा बॅटरीवरील इलेक्ट्रिक मोटरवर चालतो. ड्रायव्हला वेगळ्या लेनमधील वाहनाला ओव्हरटेक करायचे असल्यास हेच तंत्रज्ञान वापरले जाईल.