म्हापशात घराला आग लागून ८ लाखांचे नुकसान

0
95

डांगी कॉलनी-म्हापसा येथील अरुण आसोलकर यांच्या घराला गुरुवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिक बोर्डमध्ये झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे आग लागून सोन्याच्या वस्तू, ङ्ग्रीज, कपडे धुण्याचे मशिन, १ लॅपटॉप, १ मॉडेम, ३ कपाटे, १ सिलिंग पंखा, १ ङ्गोल्डिंग टेबल, १ लाकडाचे टेबल, १ खाट व घरातील कपाटात आणि बाहेर ठेवण्यात आलेले कपडे तसेच स्वयंपाक घरातील भांडी जळून खाक झाल्याने सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले.

अरुण आसोलकर हे आग लागण्यापूर्वीच अर्धा तास अगोदर घरातून बाहेर गेले होते. तर त्यांची पत्नी सकाळी कामावर गेली होती. ही आग स्वयंपाक खोलीत असलेल्या इलेक्ट्रीक बोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागली आणि घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या. या आगीने ताबडतोब पेट घेतल्याने छप्परही जळाले. अरुण आसोलकर यांनी कपाटात ठेवलेल्या १ जोड सोन्याच्या पाटल्या, १ सोन्याची सोनसाखळी, पाच नग
कर्णङ्गुले, ४ सोन्याच्या अंगठ्या, १ सोन्याची ब्रेसलेट, १ डोक्यात घालायचे सोन्याचे ङ्गूल व इतर सोन्याच्या वस्तू नष्ट झाल्या. शेजार्‍यांनी अरुणला आणि त्याच्या पत्नीला ङ्गोन करून बोलावून घेतले तसेच म्हापसा अग्निशामक दलाला यांची माहिती देताच अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी प्रथम स्वयंपाक घरात जाऊन घरात असलेले गॅस सिलिंडर प्रथम बाहेर काढले.