जंगल सफरीद्वारे प्राणी-पक्षी दर्शन

0
104

वन पर्यटन विभागाचा प्रस्ताव
बोंडला येथील प्राणी संग्रहालयाला भेट देणार्‍या देशी तसेच विदेशी पर्यटकांसाठी लवकरच जंगल सफरींचे आयोजन करण्याची योजना आहे, असे वन खात्यातील वन्यजीव व पर्यावरण पर्यटन विभागातील वनपाल डी. एन्. एफ्. कार्व्हालो यांनी सांगितले.वर्षभरात या जंगल सफरींचे आयोजन करण्यासंबंधीची योजना तयार करण्यात आलेली असून त्यासाठीच्या साधनसुविधा उभारण्यासाठीचे काम यापूर्वीच हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय यावेळी पर्यटकांना रानातील विविध पक्ष्यांचेही दर्शन घेता येणार असल्याचे कार्व्हालो यांनी स्पष्ट केले. सुमारे अर्ध्या तासाची अशी ही सफर असेल. सुरुवातीला रोज २ ते ३ सफरींचे आयोजन करण्यात येईल. नंतर पर्यटकांकडून कसा प्रतिसाद मिळतो त्यानुसार या सफरींची संख्या वाढवायची की काय त्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे कार्व्हालो यांनी सांगितले. या सफरींसाठी वाहने खरेदी करावी लागतील. सफरीच्या स्थळी दोन्ही बाजूनी तारांचे कुंपण घालावे लागले. त्याच्या मधून पर्यटकाना घेऊन वाहन निघेल. अवघ्या एक कोटी रु.त ही साधनसुविधा उभी करता येणार असल्याचे ते म्हणाले. सुरवातीला एकच वाहन खरेदी करण्यात येईल. गरज भासल्यास नंतर आणखी वाहने खरेदी करणयात येतील.
यासंबंधी अधिक माहिती देताना ते म्हणाले की सुमारे २० हेक्टर क्षेत्रात या जंगल सफरीचे आयोजन करण्याची योजना आहे. जंगल सफरीसाठी येणार्‍या पर्यटकांना एका विशेष अशा गाडीतून या सफरीसाठी नेण्यात येईल या सफरीत सहभागी होणार्‍या पर्यटकांना शाकाहारी प्राण्यांचे दर्शन घडवण्यात येईल. त्यात सांबर, चितळ, हरणे, काळवीट, चौसिंगा, रानडुकरे आदी प्राण्यांचा समावेश असेल.