चोवीस तासांत कोरोनाने तिघांचा मृत्यू, १९२ बाधित

0
90

गेल्या चोवीस तासांत नवे १९२ रुग्ण आढळून आले असून आणखी ३ रुग्णांचा बळींची नोंद झाली आहे. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या १ हजार ९५० एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३,०८२ झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०१ टक्क्यांवर पोहोचले आहे. चोवीस तासांत ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळी ३,०८२ झाले आहेत. गेल्या चोवीस तासांत ५०२२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी झाली. त्यात १९२ नमुने बाधित आढळून आले तर इस्पितळांमधून २० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण रुग्णसंख्या १,६८, हजार ०१५ एवढी झाली आहे.

२२ जण इस्पितळांत
राज्यातील इस्पितळांत दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. चोवीस तासांत नव्या २२ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहेत.

१९६ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाबाधेतून बर्‍या होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाबाधित आणखी १९६ रुग्ण काल बरे झाले. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६२ हजार ९८३ एवढी झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन १७० रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.