>> ३१७५ बाधित, एकूण १८०४ बळी
राज्यात चोवीस तासांत उच्चांकी आणखी ७५ कोरोना रुग्णांचा बळी आणि नवे ३१२४ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना बळीची एकूण संख्या १८०४ एवढी झाली आहे. सध्याची रुग्णसंख्या ३२ हजार ८३६ एवढी झाली आहे. राज्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३६.७३ टक्के एवढे आहे. इस्पितळातून १७८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात गेले कित्येक दिवस मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. काल राज्यात आतापर्यंतच्या उच्चांकी मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या संख्येमुळे गोवा हादरत आहे. राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूची वाढ कायम आहे.
चोवीस तासांत आणखी ८५०५ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. ३६.७३ टक्के नमुने बाधित आढळून आले आहेत. राज्यात जास्त संख्येने बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कायम आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे.
मंगळवारी ३२१ रुग्णालयात
कोरोना बाधित नव्या ३२१ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. दरदिवशी दोनशेच्या आसपास रुग्ण भरती होत होते. आता संख्या ३०० वर पोहोचली आहे. नवीन २९४८ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.
२४७५ जण कोरोनामुक्त
राज्यात आणखी २४७५ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९० हजार १३४ एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.२४ टक्के एवढे आहे.
७५ जणांचा मृत्यू
राज्यात ७५ रुग्णांचे निधन झाले. त्यातील गोमेकॉमध्ये ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात १७ रुग्णांचे निधन झाले. हॉस्पिसियू, ईएसआय, उत्तर जिल्हा इस्पितळ, मडकई आणि चिंचिणी येेथे प्रत्येकी १ रुग्णाचे निधन झाले. उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात २ रुग्ण आणि दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात ३ रुग्णांचे निधन झाले आहे. कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतलेल्या तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे.