चोपडे पुलावर पार्सेकरांचे भव्य स्वागत

0
87
चोपडे-शिवोली पुलावर नवनिर्वाचित मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे स्वागत करताना नागरिक. (छाया : निवृत्ती शिरोडकर)

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर संध्याकाळी लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे चोपडे-शिवोली पुलावर मांद्रे मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.यावेळी आगरवाडा सरपंच सुमन खोर्जुवेकर, उपसरपंच एकनाथ चोडणकर, मोरजी सरपंच मंदार पोके, तुये सरपंच उल्हास नाईक, उपसरपंच श्‍वाती हरमलकर, मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष अरुण बानकर, पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष दाजी कासकर तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पार्सेकरांचे स्वागत केले. यावेळी चोपडे-शिवोली पुलावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.
पेडणे तालुक्यात जल्लोष
लक्ष्मीकांत पार्सेकर यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पेडणे तालुक्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी १० वा. पासूनच मांद्रे मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी तर फटाके लावून व एकमेकांचे तोंड गोड करून आनंद साजरा करायला सुरुवात केली.
लक्ष्मीकांत पार्सेकर यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांनी व समर्थकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या.
मोरजीचे माजी सरपंच रत्नाकर शेटगावकर, माजी उपसरपंच हरि पालयेकर, संतोष शेटगावकर यांनी प्रतिक्रिया देताना या मतदारसंघाचे आमदार हे मुख्यमंत्री बनल्यामुळे सबंध तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे, असे सांगितले.