पद्मविभूषण, पद्मश्री, चिपको आंदोलनाचे नेते तसेच प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सुंदरलाल बहुगुणा (९४) यांचे काल शुक्रवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी सुंदरलाल बहुगुणा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्यांना ह्रषिकेशच्या ‘एम्स’ रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी १२ वाजता त्यांचे निधन झाले. ह्रषिकेशच्या पूर्णानंद घाटावर त्यांच्या पार्थिवावर कोरोना नियमांचे पालन करत राजकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुंदरलाल बहुगुणा यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.