Home बातम्या कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्याची आंदोलक शेतकर्‍यांची मागणी

कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्याची आंदोलक शेतकर्‍यांची मागणी

0

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनातील एक संघटना संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तिन्ही कृषी कायद्यांबाबत पुन्हा शेतकर्‍यांशी चर्चा करावी अशी मागणी केली आहे. या संदर्भात काल शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांना हे पत्र लिहिले आहे.

कोरोना काळात शेतकरी कोणाचेही आरोग्य धोक्यात घालू इच्छित नाहीत. तसेच हे आंदोलनही मागे घेऊ इच्छित नाहीत असे शेतकर्‍यांनी म्हटले आहे. तसेच संयुक्त किसान मोर्चा आपले आंदोलन शांततेने यापुढेही सुरूच ठेवेल असे पत्रात म्हटले आहे.

कोरोना काळातही शेतकरी आंदोलन करत असून कोरोनाचे संकट पाहता शेतकर्‍यांनी आपले आंदोलन स्थगित ठेवावे अशी मागणी विविध स्तरातून केली जात आहे. मात्र भारतीय शेतकरी संघटेनेचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे स्पष्टपणे सांगितले.