चिखलीत कॅसिनोंना राष्ट्रवादीचा विरोध

0
81

जुवारी नदीच्या पात्रात चिखली येथे कॅसिनो आणण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध असल्याचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पक्षाचे राज्य युवाध्यक्ष नझीर खान, आंतोनिओ परेरा, जॉर्ज बार्रेटो, नगरसेवक पास्कोल डिसोझा आदी उपस्थित होते. कॉंग्रेस सत्तेवर असताना भाजपने कॅसिनोंना विरोध केला होता. आता तेच अभय देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कॅसिनो जुवारी नदीत आणल्यास त्याचे परिणाम पारंपरिक मच्छीमारांवर होणार असल्याचे जुझे फिलिप यांनी सांगितले.