चार दहशतवाद्यांना काश्मीरात अटक

0
70

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलांनी काल पहाटे चार दहशतवाद्यांना अटक केली असल्याची माहिती भारतीय लष्करी अधिकार्‍यांनी दिली.
अटक करण्यात आलेले दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार भारतीय सुरक्षा दलांनी व्यूहरचना केली. दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरण्यात आले. यावेळी दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. यावेळी ७ दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते. त्यापैकी तिघांना पळून जाण्यात यश आले. चौघांना सुरक्षा दलांनी शरणागती पत्करल्याची संधी दिली. त्यानुसार दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम अजूनही सुरू असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे.