चार अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची ओबामांकडून घोषणा

0
79
दिल्लीतील उद्योजकांच्या परिषदेत बोलताना बराक ओबामा. बाजूस पंतप्रधान नरेंद्र मोदी.

सरकारच्या पाठबळावरील भारतातील उद्योगांमध्ये ४ अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजिलेल्या उद्योजकांच्या परिषदेवेळी ओबामा यांनी ही घोषणा केली. अमेरिकेतील उत्पादनांच्या निर्यातीसाठी अमेरिकी निर्यात-आयात बँक १ अब्ज डॉलरचे वित्त सहाय्य देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.भारतातील ग्रामीण भागांमधील लघु व मध्यम उद्योगांसाठी ओव्हरसीज प्रायव्हेट इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशनतर्फे एक अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचेही ओबामा म्हणाले. तसेच पुननिर्र्ंमाण ऊर्जेसाठी अमेरिकेच्या व्यापार व विकास प्राधिकरणातर्फे आणखी २ अब्ज डॉलर्स देण्यात येतील असेही त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.