ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण कालवश

0
117

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे काल वयाच्या ९४ व्या वर्षी पुणे येथील इस्पितळात निधन झाले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लक्ष्मण यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भारताने ‘कॉमन मॅन’ गमावला अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.मूत्रविषयक संसर्गामुळे त्रस्त असलेल्या लक्ष्मण यांना गेल्या आठवड्यात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. लक्ष्मण यांनी व्यंगचित्रकार म्हणून आपल्या संपूर्ण कारकीर्दीत समाजाच्या आरशाच्या प्रतिबिंबाच्या रुपात ‘कॉमन मॅन’ला सादर केले. त्या माध्यमातून त्यांनी राजकीय नेत्यांवर उपहासात्मक मर्मभेदी टिप्पणी केली. मात्र अलीकडील काळात त्यांनी राजकीय व्यंगचित्रे रेखाटणे थांबविले होते.
आर. के. लक्ष्मण हे कादंबरीकार स्व. आर. के. नारायण यांचे बंधू होत. त्यांच्या पश्‍चात लेखिका पत्नी कमला, निवृत्त पत्रकार श्रीनिवास व स्नुषा उषा असा परिवार आहे.